दर्गाह अस्ताने आलिया हजरत ख्वाजा हामिद अली शाह येथे हरित धाराशिव अभियान अंतर्गत वृक्षारोपण संपन्न

कळंब (परवेज मुल्ला) : “हरित धाराशिव” या अभियानांतर्गत, दिनांक 19 जुलाई रोजी पवित्र दर्गाह अस्ताने आलिया हजरत ख्वाजा हामिद अली शाह येथे दरगाह परिसरात वृक्षारोपणाचा एक प्रेरणादायी उपक्रम पार पडला.या कार्यक्रमाचे आयोजन हमीदिया, हमीदिया जनहित बहुद्देशीय सेवाभावी संस्था, ता. कळंब, जि. धाराशिव आणि सूफी संत तहरीके सिराते मुस्तकीम सेवाभावी संस्थे मार्फत करण्यात आले होते.या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष हजरत डॉ. शाह ज़ाकिर हामिद साहब यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. परिसरातील लोकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, ६ वर्षांपूर्वीही याच पवित्र स्थळी ५०० झाडांची लागवड करण्यात आली होती आणि त्या झाडांची योग्य निगा राखण्यासाठी ( वृक्ष संवर्धन व संरक्षण) करण्यासाठी एक व्यक्तीची नेमणूक करून त्याच्याकडे ही जिम्मेदारी दिली होती आजही ती व्यक्ती दर्गाह येथे कार्यरत असून, त्याच्या सातत्यपूर्ण सेवेमुळे ती झाडे आजही तग धरून आहेत आणि हिरवाईने परिसर सुशोभित करत आहेत.”झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश पुन्हा एकदा जनमानसात पोहोचवण्याचा आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारस ठेवण्याचा हा सुंदर प्रयत्न होता. या कार्यक्रमाला दर्गाहचे सचिव शाह नसीम, कोषाध्यक्ष साजिद काझी, हाफिज आरेफ मनीयार, हभप. महादेव महाराज अडसूळ, माधवसिंग राजपूत, अकीब पटेल संदीप कोकाटे ,अमर चाऊस, शाह रजियोद्दीन, शेख वसीम, शेख तैमूरलंग, सय्यद ख्वाजामिया, सय्यद आदिल, काकासाहेब जाधव, अमन शेख, सय्यद तौफिक, सय्यद मुजाहीद अली, मोहम्मद अली, शाह मोसीन, आदी उपस्थित होते.