न्यूक्लिअर पॉवर ऑफ कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये शास्त्रज्ञ म्हणून विवेक सुरवसे यांची निवड कळंब मध्ये सत्कार बालपणी ठरवलेलं स्वप्न साकार झालं — विवेक सुरवसे

कळंब (परवेज मुल्ला) : विवेक सुरवसे यांची भारत सरकारच्या न्यूक्लिअर पॉवर ऑफ कॉर्पोरेशन लिमिटेड येते शास्त्रज्ञ म्हणून निवड झाल्याबद्दल कळंब मध्ये त्यांचा व त्यांच्या आई-वडील यांचा सत्कार करण्यात आला. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे विवेकचे भविष्य लहानपणी दिसत होते . विवेक चे वडील हे जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शिक्षक असून आई ग्रहणी आहेत लहानपणापासून जिद्द, चिकाटी मेहनत यामुळेच ते यशस्वी झाले आहेत. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा पिंपरी व माध्यमिक शिक्षण जनता विद्या मंदिर मुरुड व उच्च माध्यमिक शिक्षण शाहू कॉलेज येथे केले त्यानंतर आयआयटी मद्रास येथे प्रवेश मिळाला. आणि पुढे शास्त्रज्ञ म्हणून त्यांची निवड झाली. विवेक यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले की मी शास्त्रज्ञ म्हणूनच जगणार व शास्त्रज्ञ म्हणूनच मरणार मी इतर कुठेही नोकरी करणार नाही मला भारत मातेची सेवा निस्वार्थी भूमिकेतून करायचे आहे व मी लहानपणी उराशी बाळगलेले स्वप्न साकार झाले याचा आनंद मला व माझ्या कुटुंबाला झाला असे त्यांनी सांगितले. यावेळी अनिरुद्ध डिकले, दिपक खोडसे, कस्पटे अप्पासाहेब, सुरवसे ज्ञानेश्वर, यशवंत सावंत डॉ.अशोक शिंपले, ज्ञानेश्वर तोडकर, किरण खरडकर, प्रदिप यादव, श्रीमती सविता मेटे, श्रीमती सारिका कस्पटे, श्रीमती सिंधू सावंत, श्रीमती सुवर्णा डिकले, श्रीमती प्रतिभा सूरवसे यांच्या उपस्थित सत्कार करण्यात आला.