शिवाचार्य यांच्या उपस्थितीत कलशारोहन, प्रवचन व महाप्रसादाने सांगता.. दहा हजारांहून अधिक भाविकांची उपस्थिती; भक्तिरसात न्हालेली कळंब नगरी

कळंब (परवेज मुल्ला) :संत शिरोमणी मन्मथ स्वामी तिर्थक्षेत्र जन्म भुमी मंदीर जिर्णोध्दार व कलशारोहन सोहळ्यामध्ये शिवाचार्य यांच्या उपस्थितीत विविध देवी देवतांची शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये दहा हजार पेक्षा जास्त भाविक सहभागी झाले होते. संत शिरोमणी मन्मथ स्वामी तिर्थक्षेत्र जन्म भुमी मंदीर जिर्णोध्दार व कलशारोहन सोहळा दोन दिवसापासून चालू आहे. दिनांक २० जुलै रोजी स्थापन करण्यात येणाऱ्या संत शिरोमणी मन्मथ स्वामी, महादेव, नंदी, अण्णपुर्णा, हनुमान यासह विविध देवतांच्या मुर्तीची नगरप्रदक्षिणा काढण्यात आली आहे. यावेळी..शिवाचार्य यांचा सहभाग होता. मन्मथ स्वामी मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेनरोड या मार्गाने मिरवणूक काढण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेच्या वतीने फ्रुटी व कॉग्रेस शहराध्यक्ष शशिकांत निरफळ यांच्या वतीने पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले आहे. दुपारी दोन वाजता विविध शिवाचार्य यांच्या उपस्थितीत धर्मसभा झाली आहे. यावेळी अर्जुन चिंचकर यांनी अन्नदान केले. रात्री शिवकिर्तन श्री.ष.ब्र.प.पू. १०८ दिगंबर शिवाचार्य महाराज – वसमत यांचे झाले, यावेळी ट्रस्ट चे अध्यक्ष सागर मुंडे यांचा सन्मान करण्यात आला आहे. या कार्यक्रमास मोठय़ा संख्येने भाविक उपस्थित होते. चौकटयावेळी टाळांच्या मंगल निनादात, पारंपरिक वेशभूषेत महिला एकसुरी पद्धतीने पाऊल खेळत भक्तिरसात रंगलेल्या दिसल्या, त्याच बरोबर रुद्र तांडव नृत्याने सर्वांचे लक्ष वेधले.चौकटआमदार कैलास घाडगे पाटील, विरशैव इंटरनॅशनल असोसिएशन चे ओमप्रकाश कोयटे, लिंगायत संघर्ष समिती अध्यक्ष सुनिल रुकारी, लिंगायत संघर्ष समिती उपाध्यक्ष राजेंद्र मुंडे, माजी उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन काळे, कपिलधार ट्रस्ट चे अध्यक्ष आप्पा हलगे यांच्यासह अनेकांनी मिरवणूकीचे स्वागत केले.चौकट२१ जुलै रोजी सकाळी महादेव शिवाचार्य महाराज-वाईकर व विरुपाक्ष शिवाचार्य महाराज-मानुरकर यांच्या हस्ते कलशारोहन सोहळा पार पडला. यानंतर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज बाळापुरकर यांचे प्रवचन झाले. यावेळी काशिनाथ शिवाचार्य महाराज पाथरी, ह.भ.प. संदीपान महाराज हासेगावकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली, व आभारप्रदर्शन निलेश होनराव व अविनाश खरडकर यांनी मानले.

