श्रमिक मानवाधिकार संघाचे उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालया समोर “मौन सत्याग्रह” आंदोलनाचे आयोजन

कळंब (परवेज मुल्ला) : तालुक्यातील मौजे पानगाव येथील आदिवासी पारधी समाजावर टाकलेला सामाजिक बहिष्कार व त्यामुळे गुन्हे नोंद झालेले (सी.आर. १९२/२०२५) आरोपींना अद्यापही अटक झाली नसल्याने त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी श्रमिक मानवाधिकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भाई बजरंग भाऊ ताटे यांनी कळंब पोलीस उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मौजे पानगाव ता. कळंब जि. धाराशिव येथील गायरान व वन जमीन गट नं. ३२ मध्ये राहत असलेल्या आदिवासी पारधी कुटुंबावर मासीक, ग्रामसभा घेऊन समाजिक बहिष्कार टाकला म्हणून सी.आर./१९२/२०२५ नुसार गुन्हे दाखल झालेले आहेत ते आरोपी अद्याप मोकाट आहेत त्यांना अटक करावी, दि. २७/०५/२०२५ रोजी मासिक सभा व दिनांक २९/०५/२०२५ रोजीच्या ग्रामसभेतील ठराव सुचक व ठराव अनुमोदक यांच्यावर गुन्हे दाखल झालेले नाहीत तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, ग्रामसभेतील सदस्य प्रोसेडींग बुकावर ज्या ग्रामसभेच्या सदस्याच्या सहया आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत,आपल्या कार्यालयास यापुर्वी निवेदन दिलेले आहेत त्यातील मागण्याबाबत संबंधीत यंत्रणेला पत्र पाठवुन सेवा देण्यात याव्यात, गायरान व वनजमीन गट नं. ३२ मध्ये राहत असलेल्या आदिवासी पारधी कुटुंबाला पोलीस संरक्षण देऊन कॅम्प लावण्यात यावा, बजरंग ताटे व माया शिंदे यांना पोलीस सरंक्षण देण्यात यावे, गुन्ह्यातील आरोपीं अटक न केल्यामुळे समाजात वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत अशा मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत सदरील निवेदनाच्या प्रति मा. जिल्हाधिकारी साहेब, धाराशिव, मा. पोलीस अधिक्षक साहेब, धाराशिव, मा. उपविभागीय अधिकारी साहेब, कळंब, मा. तहसिलदार साहेब कळंब, मा. सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेब, येरमाळा ता. कळंब, मा. पोलीस निरीक्षक साहेब,पोलीस स्टेशन कळंब आदींना देण्यात आल्या असून सदरील मागण्यावर न्याय न मिळाल्यास दि.२८ जुलै २०२५ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कळंब समोर कार्यालयीन वेळेत “मौन सत्याग्रह” आंदोलन करण्यात येणार असल्याचे श्रमिक मानवाधिकार संघाचे भाई बजरंग ताटे व माया शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.