अनंतराव घोगरे यांचा राज्यस्तरीय भारत गौरव पुरस्काराने सन्मान

कळंब (परवेज मुल्ला) :- अनंतराव साहेबराव घोगरे रा. गोविंदपूर ता. कळंब जि. धाराशिव याना उत्कृष्ट सामाजिक कार्य केल्याबद्दल हिरकणी महिला विकास संस्था कोरेगाव – भीमा (रजि.) या सामाजिक बांधिलकी राखुन काम करणाऱ्या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय भारत गौरव पुरस्काराने रपत्रकार भवन, गंजवे चौक नवी पेठ, पुणे येथे आयोजित कार्यक्रमात शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, हिरकणी महिला विकास संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी महाराष्ट्रामध्ये निर्भीड, सक्षम, कार्यक्षमतेने वावरणाऱ्या समाजातील उत्कृष्ठ कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय, पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींच्या कार्यालाप्रोत्साहन देऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते, पुरस्कार प्राप्त अनंतराव घोगरे पाटील यांचे हिरकणी महिला विकास संस्थेचे पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष – शर्मिला देविदास गव्हाणे. सल्लागार संदीप पोपट गव्हाणे, सचिव रोहित देविदास नलावडे ,खजिनदार रोशन देविदास नलावडे यांनी घोगरे यांचे अभिनंदन केले आहे.