अभिनव इंग्लिश स्कूलची मान्यता रद्द करा – मनसे

धाराशिव ( परवेज मुल्ला) : शहरातील अभिनव इंग्लिश स्कूल शाळेमध्ये कु.वेदीका सचिन मोरे इयत्ता पाचवी वर्गात शिक्षण घेत आहे फीस भरण्यास विलंब झाल्यामुळे विद्यार्थ्यांनीला वर्गाच्या बाहेर व शाळेच्या बाहेर काढण्यात आले सावित्रीच्या लेकी म्हणून म्हणून मनोधैर्य वाढविणारा समाज एकीकडे आणि त्याच लेकीला कोळ्या चिमुकला फिस भरण्यास उशीर झाल्यामुळे शिक्षणाचे व्यापारीकरण करणारी अभिनव इंग्लिश स्कूल शाळेतून बाहेर काढत आहेत हा प्रकार दिनांक १७-६-२५ रोजी घडला असुन पालकांनी शिक्षण अधिकारी (प्राथमिक) यांना भेटून निवेदन दिले आहे तसेच या आर. टी.ई.अंतर्गत शिक्षणाचा लाभ न देणे,आर.टी.ई. अंतर्गत विद्यार्थ्यांचे वर्ग वेगळे करणे,आर.टी.ई. अंतर्गत विद्यार्थ्यांकडून फीस वजन करणे, जास्तीची फिस घेणे, पालक समिती निवड न करणे, विद्यार्थ्यांना लातूर पॅटर्न सक्ती करून ल़ाखोंची लुट केली जात आहे, तसेच शालेय साहित्य सांगितलेल्या दुकानातून खेरीदीची सक्ती करून ल़ाखोंची लुट केली जात आहे असे निवेदन मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी शिक्षण अधिकारी प्राथमिक/माध्यामिक यांना भेटून दिले आहे यावेळी मुलींचे पालक सचिन मोरे, समाजसेवक महादेव(मामा)माळी उपस्थित होते.