कळंब मध्ये संत नामदेव महाराजांचे भव्य मंदिर उभारणार

कळंब : गेल्या अनेक वर्षापासून शिंपी समाज पाहत असलेले स्वप्न आज पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करीत आहे समाजाने कळंब शहरात संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे भव्य मंदिर निर्माण करण्याचे ठरले होते तो मार्ग आता मोकळा झाला आहे. मंदिरासाठी आवश्यक असलेली जागा कै. बलभीम शंकराव कल्याणकर व कै. सुमनबाई बलभीम कल्याणकर यांच्या स्मरणार्थ कल्याणकर परिवारातील परळी वैजनाथ येथील नंदकुमार कल्याणकर यांच्याकडून सदरील जागा ही संत शिरोमणी नामदेव शिंपी समाज कळंब यांना संत शिरोमणी नामदेव विठ्ठल मंदिरासाठी श्री विठ्ठल व नामदेव महाराज यांच्या चरणी दिनांक 10/07/ 2025 रोजी समर्पित करण्यात आली समस्त नामदेव शिंपी समाज कळंब व युवक व महिला मंडळ यांच्याकडून कल्याणकर परिवाराचे मनापासून आभार व धन्यवाद व्यक्त करण्यात आले या जागा समर्पण कार्यक्रम प्रसंगी शिंपी समाजातील सागर बारटक्के, शशिकांत बारटक्के ,अतुल मुळे ,सचिन धोकटे, भगवान बारटक्के, एकनाथ कटारे, शुभम धोकेटे, प्रशांत सातपुते, ज्ञानेश्वर बारटक्के, विपिन कटारे, किशोर झोकटे, नामदेव पाटसकर, राहुल धोकटे, गजानन बारटक्के, रवींद्र बारटक्के, गजेंद्र बारटक्के, नितीन धोकटे, प्रशांत सलगर, शेंडगे सर, सुरेश कल्याणकर, बाबासाहेब कल्याणकर, आनंद गोंदकर, विजय पोरे राहुल पोरे, आदी उपस्थित होते.