July 24, 2025

कळंब शहरात शेकडो युवकांचा काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश इरफान बागवान यांची युवक काँग्रेस शहराध्यक्षपदी नियुक्ती पक्ष संघटना बळकट करण्याचे कॉंग्रेस तालुकाध्यक्ष पांडुरंग तात्या कुंभार यांचे अविरत प्रयत्न सुरू…

0
IMG-20250708-WA0011

कळंब (ता. कळंब, जि. धाराशिव) – काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय, लोकशाही मूल्ये आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी सातत्याने सुरू असलेल्या संघर्षावर श्रद्धा ठेवत कळंब शहरातील शेकडो युवकांनी आज काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या युवकांनी पक्षाच्या विचारसरणीशी एकरूप होत समाज परिवर्तनाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार केला.प्रवेशकर्त्यांमध्ये वसीम बागवान, बबलू बागवान, बाबु बागवान, समीर बागवान, राजू बागवान, मुक्तार बागवान, सलमान बागवान, खालील बागवान, जाकिर बागवान, निहाल बागवान, शाखेर बागवान, सद्दाम बागवान, जावेद बागवान, गौस बागवान, शाहरुख बागवान, अली बागवान, आलिम बागवान, साहिल बागवान, शोहेब बागवान यांचा समावेश आहे.या प्रवेश सोहळ्यावेळी काँग्रेसचे स्थानिक नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये कळंब तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. पांडुरंग कुंभार, कळंब काँग्रेस शहराध्यक्ष मा. शशिकांत निरपळ, शहर कार्याध्यक्ष मा. सचिन गायकवाड, अल्पसंख्यांक सेल तालुका अध्यक्ष मा. शहाजान शिकलगार यांचा समावेश होता. नवप्रवेशितांचे स्वागत करत सर्व मान्यवरांनी त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. काँग्रेस पक्षाला मिळणारा युवकांचा पाठिंबा समाजपरिवर्तनासाठी एक सकारात्मक पाऊल ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.तसेच याच कार्यक्रमात श्री. इरफान रफिक बागवान यांची युवक काँग्रेस कळंब शहर अध्यक्षपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ, मा. आमदार अमित विलासराव देशमुख, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा. कुणाल राऊत, जिल्हाध्यक्ष श्री. धिरज पाटील, जिल्हाध्यक्ष अश्लेष मोरे, तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार व विधानसभा अध्यक्ष शशिकांत निरपळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.यावेळी नियुक्तीचे पत्र कळंब तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पांडुरंग कुंभार व कळंब शहराध्यक्ष शशिकांत निरपळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. काँग्रेस पक्षाचे विचार व धोरणे गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्यासाठी श्री. इरफान बागवान यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास तालुका अध्यक्ष पांडुरंग कुंभार यांनी यावेळी व्यक्त केला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आताच्या बातम्या