सर्व खाजगी शिक्षण संस्थांची चौकशी करून रोड रोमिओचा बंदोबस्त करा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल हैसलमल यांची कळंब पोलीस निरीक्षक यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी…

कळंब : शहरातील अनेक शाळा, महाविद्यालये आहेत. ग्रामीण भागातून शिकण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामीण मुली कळंब शहरात येतात. या विद्यार्थिनींना बस किंवा खासगी वाहनाद्वारे प्रवास करावा लागतो. बसच्या प्रतिक्षेत असणार्या विद्यार्थिनींना अनेकदा रोडरोमियोकडून मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. पोलीस प्रशासनाने या समस्येकडे गंभीर लक्ष देण्याची मागणी राष्ट्रषवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल हौसलमल यांनी पोलीस निरीक्षक सानप सर यांना निवेदन देऊन केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनेकदा दुचाकी वाहनावरून येणार्या टवाळखोर मजनूकडून मुलींना मानसिक त्रास सहन करावा लागतो. असे प्रकार टाळण्याच्यादृष्टिने पोलीस प्रशासनाचे लक्ष देणे गरजेचे ठरत आहे तसेच शहरातून शाळा,कॉलेज,ट्युशन जाणार्या मार्गावर औद्योगिक प्रशिक्षण संस्था,सावित्रीबाई फुले विद्यालय, विद्याभवन हायस्कूल,जनजागृतीळा शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, शिवाजी कॉलेज,रेणुका नर्सिंग विद्यालय,आय. टी. या ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी ये-जा करतात आणि प्रायव्हेट शिकवणी वर्ग आहेत. त्यामुळे सकाळी व सायंकाळी विद्यार्थ्यांची वर्दळ असते. शिवाय शाळा सुटल्यानंतर किंवा शिकवणी वर्ग सुटल्यानंतर सायकलने ग्रामीण भागात किंवा घरी जाणार्यया विद्यार्थिनींची रोडरोमियो पाठलाग करतात. चौकातही टवाळखोरांचा त्यांना त्रास सहन करावा लागतो. हीच परिस्थिती मांडवकर कोचिंग क्लासेस समोर सर्रास दिसून येते.यापूर्वी काही शाळांच्या प्रशासनाने शाळा सुटण्याच्या व सुरू होण्याच्यावेळी पोलिसांनी सेवा द्यावी, अशी विनंती पत्राद्वारे केली होती. या अर्जानंतर काही दिवस येथे पोलिसांची गस्त होती. परंतु काही दिवसानंतर येथे पोलीस राहत नसल्याची संधी साधुन टवाळखोर मुलींना नाहक त्रास देतात.तसेच खाजगी शिक्षण देणाऱ्याप्रत्येक शिक्षकाची चारित्र पडताळणी करून घ्यावी.विद्यार्थिनींच्या तक्रारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष राहुल हौसलमल, यांनी मागणीचे दिले दिले असुन यावर अमर गोरे सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
