ह.भ.प. महादेव महाराज अडसूळ राज्यस्तरीय किर्तन भूषण पुरस्काराने सन्मानित.

कळंब (परवेज मुल्ला) :- कळंब येथील श्री संत ज्ञानेश्वर बालकाश्रम संचालक व ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष कीर्तनकार ह.भ. प. महादेव महाराज अडसूळ यांचा राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र व जागृत नागरिक सेवा महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक २७ जुलै रोजी राजर्षि शाहू महाराज भवन कोल्हापूर येथे आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात राज्यस्तरीय कीर्तन सेवा पुरस्काराने ह.भ.प. महादेव महाराज यांचा फेटा, पुष्पहार, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन आमदार सतेज पाटील गटनेते विधान परिषद मुंबई यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला याप्रसंगी महादेव महाराज अडसूळ , सरस्वती अडसूळ (दाम्पत्यांनी) हा पुरस्कार स्वीकारला, मंचावर राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष सुरेश केसरकर, राज योगिनी ब्रह्मकुमारी सुनीता बेहेनजी, अनिल महामने — अध्यक्ष निर्मिती विचार मंच, डॉ.रविकांत पाटील चेअरमन केंद्रीय श्रमिक बोर्ड, विशाल घोडके – सहा, कामगार आयुक्त, विजय शिंगाडे- कामगार कल्याण अधिकारी, अच्युतराव माने- राज्य सचिव गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात सामाजिक ,साहित्यिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, आरोग्य ,पत्रकारिता, उद्योग, कृषी ,गायन, किर्तन सेवा,शासकीय व निमशासकीय सेवेत वैशिष्ट्यपूर्ण कार्य तसेच समाजातील वंचित व उपेक्षित घटकासाठी सेवाभावी वृत्तीने सर्व क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या राज्यातील कार्यकर्त्यांना विश्वकर्मा राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.