April 13, 2024

घराणेशाही टिकवण्यासाठी विरोधकांची केवीलवाणी धडपड खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

0

वाशी ता. 7- 2019 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभरावाचा सामना करणाऱ्या पाटील कुटुंबीयांनी ज्या शरदचंद्र पवार साहेबांना मोठे केले त्यांना सोडून कमळ हाती घेत भा.ज.पा. मध्ये पक्ष प्रवेश करुन तुळजापुरची आमदारकी पदरी पाडून घेत मागील 5 वर्ष पालकमंत्री पदाची स्वप्न पाहिली. या वर्षीच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये धाराशिव मतदार संघ महायुतीमध्ये राष्ट्रवादी कांग्रेस (आजित पवार) यांना मिळाल्याने लोकसभेचे उमेदवारी पत्नीस मिळून दिली. ही सर्व केवीलवाणी धडपड केवळ पाटील कुटुंबाचे घराणेशाही टिकवण्याकरीता आहे. स्वतः भाजप पक्षामध्ये व पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून ही तारेवरची कसरत केवळ सत्तेच्या हाव्यासापोटी आहे. धाराशिव जिल्हयातील मतदार जागृत झाला असून यांच्या भुलथापांना बळी न पडता यांना योग्य जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.मी सातत्याने धाराशिव लोकसभा मतदार संघांतर्गत सर्व शेतकऱ्यांच्या अडचणीच्या अनुषंगाने लोकसभेमध्ये प्रश्न मांडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भाने सातत्याने पाठपुरावा केला. तसेच शेतकऱ्यांना एन.डी.आर.एफ/ एस.डी. आर. एफ. दुष्काळाचे अनुदान अतिवृष्टी अनुदान, प्रधानमंत्री पिक विमा, शेतकऱ्यांकरीता रासायनीक खतावरील सबसीडी, सोयाबीन, कांदा, द्राक्षे, ऊस दर आदी प्रश्नांसंदर्भात सातत्याने पाठपुरवा करुन आर्थीक मदत मिळून दिली आहे. याचबरोबर लोकसभेमध्ये मराठा व धनगर आरक्षण, लिंगायत धर्मास मान्यता देवून अल्पसंख्याकाचा दर्जा देणेबाबत, मुस्लीम समाजातील विद्यार्थ्यांकरीता शिष्यवृत्तीसंदर्भात लोकसभेत प्रश्न विचारुन पाठपुरवा केला.लोकसभेमध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीन संदर्भात (आयात निर्यात धोरण), कांदा निर्यात बंदी व निर्यात शुल्कत वाढ (2023-2024), तुरदाळ आयात संदर्भात, ऊस, द्राक्षे, टोमॅटो दर, दुध दर संदर्भात, वारंवार शेतकऱ्यांची बाजू लोकसभेमध्ये मांडून शेतकऱ्यांच्या बाजूने लोकसभेमध्ये आवाज उठवला. शेतकऱ्यांची समस्या जाणून शेतकऱ्यांसाठी काम करणारे लोकप्रतीनिधी तसेच संकटाच्या काळात माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून 50 खोक्यांना बळी न पडता निष्ठेने त्यांच्या पाठीशी उभे राहिले म्हणून सारोळा मां ता. वाशी येथील शेतकरी श्री. शिवराज नानाभाऊ नांगरे यांनी आपल्या शेतीच्या उत्पन्नातून स्वयंस्पुर्तीने खासदार ओमप्रकाश राजे निबाळकर यांना 10000/- रुपये चा चेक देवून आर्थीक मदत केली आहे.[18:28, 08/04/2024] Omkar Dnyaneshwar Waghmar: आज वाशी तालुक्यातील गावभेट दौऱ्यादरम्यान सदर चेक खासदार ओमप्रकाश राजे निवाळकर यांच्याकडे सुपूर्त केला आहे. श्री. शिवराज नानाभाऊ नांगरे यांच्या कार्याचे शिवसेना कार्यकत्यांकडून कौतुक होत आहे. याचबरोबर सलू, पिपळगाव (कोठावळे) सारोळा (मांडया), पिंपळगाव (लि), सारोळा (वाशी), सोनेगाव, दळवेवाडी, बोडकी, झिन्नर, दसमेगाव मांडवा, सोनारवाडी, बावी आदी गाव भेंट दौरा घेण्यात आला.याप्रसंगी भूम परांडाचे माजी आमदार राहुल भैय्या मोटे, रणजित ज्ञानेश्वर पाटोल- जिल्हाप्रमुख, विकास मोळवणे तालुका प्रमुख वाशी, दिलीप पोलप तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी वाशी, राजेश शिंदे तालुका अध्यक्ष कांग्रेस वाशी, विलास शाळू सरचिटणीस काँग्रेस, काकासाहेब पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक, चेतन बोराडे उपजिल्हाप्रमुख शिवसेना सुदन पाटील माजी सभापती वाशी. रणजित गायकवाड सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी, तात्यासाहेब गायकवाड उपसभापती वाशी, प्रदीप मेटे उपजिल्हाप्रमुख शिवसेना, काकासाहेब मोरे बाजार समिती संचालक वाशी, नितिन विक्कड प्रदेश युवक उपाध्यक्ष शरद पवार गर, रबि कारे आळणीकर, शाम शिद माजी सभापती प.स.सभापती, नितिन शिद राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष वाशी शरद पवार गट पिंटू पाटोल इंदापूर माजी सरपंच, दत्तात्रय भांगे, बालाजी शिये व्हाईस चेअरमन वि.का.सो.. बळीराम शिंदे, हनुमंत शिंदे आदी कार्यकतेसह नागरीक उपस्थीत होते. आपण सदरील बातमी आपल्या दैनिकातून प्रसिद्ध करावी

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *